हॅलो महाराष्ट्र । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे. एकीकडे मतदानाची तारीख जवळ येत आहे, तर दुसरीकडे नेत्यांच्या जीभा सारख्या घसरू लागल्या आहेत. असंच एक वादग्रस्त वक्तव्य भाजपाच्या नेत्यानं केलं आहे. “दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात बहुतांश लोक पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहे,” भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला. या कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शाहीन बागेतील आंदोलनावर भाजपाकडून टीका केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा आला असून, याविषयी बोलताना भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांची जीभ घसरली. “दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेल्या आंदोलनात बसलेले बहुतांश लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले आहेत,” असं विधान सिन्हा यांनी केलं आहे.
“शाहीन बाग येथे सुरू असलेलं आंदोलन सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात नाही, तर ते नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीन बाग हा देशाला तोडणारा मंच आहे,” अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
देशद्रोहाचे कलम १२४ A काय आहे? काय आहे देशद्रोह कलमामागील इतिहास, वाचा सविस्तर
भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल – पंतप्रधान मोदी
सरन्यायाधीशांनी भाजपाला फटकारलं; राजकारणासाठी कोर्टाचा वापर करू नका!