सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील राजवाडा येथील नगरवाचनालया जवळ दि. 6 फ्रेबुवारी रोजी रात्री 10. 30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबतची शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करणेत आला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार गुन्ह्यातील चोरटयाचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत होते. सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटबाबत तांत्रिक माहीती प्राप्त केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने मंगळवार पेठ, सातारा येथील पापाभाई पत्रेवाला चाळ येथील एका युवकास ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करुन नमुद चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार श्रीमती भोसले या करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे, सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हेड कॉ. हसनी, लैलेश फडतरे, पो.ना. अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली आहे.