व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठे होते? केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला. कालपर्यंत ते कुठे होते ?? आत्तापर्यंत त्यांनी किती गाठी घेतल्या असा सवाल त्यांनी केला.

दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीका केली. युवासेनेचे एक प्रमुख आहेत, त्यांचे नाव घेणार नाही. पण, हे कालपर्यंत ते कुठे दिसत नव्हते. सातव्या मजल्यावरील आपल्या कार्यालयात किती वेळेस ते गेले. त्यांनी किती गाठी भेटी घेतल्या असे एकामागून एक सवाल केसरकरांनी केले. तसेच आज तुम्ही मुंबईत दिसू लागला आहात अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. २०१४ पासून रोज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद व्हायची. रोज दिल्लीवर टीका व्हायची. तरीही आपलं राज्य सुरळीत चालावं, अशी तुमची अपेक्षा होती. ते जे घडत होतं त्याला कोण जबाबदार होता. असं म्हणत केसरकरांनी राऊतांवर टीका केली. तुमच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. टीका-टिपण्णी करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा घेऊन तो मार्गी लावा असा सल्लाही त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.