भाजपने सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा; शंभूराज देसाईंनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली

Shambhuraj desai chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील माहाविकास आघाडीचे सरकार १० मार्च नंतर पडेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर महाविकास आघाडी तील नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याना विचारले असता त्यांनी एका वाक्यात चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली

शंभूराज देसाई म्हणाले भाजपाने महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा. माहाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून दोन वर्षात भाजपाने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र सरकार इंचभरही हलले नाही आणि येथून पुढेही हलणार नाही असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनीही चंद्रकांत दादांच्या विधानाची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटील हे निष्पाप आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण सरकार पडत नाही. त्यातून नैराश्य येतं. मग पुढची तारीख देतात असा टोला त्यांनी लगावला