जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसं उत्तर देऊ; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

उद्धव ठाकरे यांच शिमगा सभेचं भाषण हे दर्जा घसरलेलं होतं. तसंच खालच्या स्थराला जाऊन त्यांनी हे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांची घोर निराशा यामुळं झाली आहे. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा सांगता. त्यांना ही भाषा शोभत नाही. पुन्हा जर जीभ हासडण्याची भाषा कराल तर याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची नुकतीच कोकणात एक सभा झाली. त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणातील सर्वात दर्जा घसरलेले भाषण या सभेत झाले. उद्धव ठाकरे इतक्या खालच्या थराला जाऊन भाषण करतील अशी अपेक्षा महाराष्ट्राला नव्हती. किमान आमच्या सारख्या लोकांनी त्याच्यासोबत गेल्या वर्षी काम केले होते त्यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केले आहे हि राज्यातील सर्वसामान्यांची घोर निराशा करणारे आहे असे दिसते.

शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीला जाऊन ते बोलले. त्यांच्या या टिकेचं आम्ही निषेध करतो. एकच सांगतो उद्धव ठाकरें पेक्षा जास्त पुढचं आम्हाला बोलता येतं. आमच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं आहे कि आपण संयम सोडायचा नाही. मात्र, आमचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना योग्य उत्तर दिले आहे, असे मंत्री देसाई यांनी म्हंटले.