हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काहींना काही अशा घटना घडतात कि त्यामुळे काही नेते चर्चेत येतात. यावर्षी अधिवेशनात शिंदे गटाचे नेते तथा उत्पादन शुल्कमंत्री, आमदार शंभूराज देसाई सभागृहातील एका व्हायरल व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात बोलत असताना देसाई यांनी मागच्या बाकावर बसलेल्या आमदार भरत गोगावलेंना स्वतःच्या खिशातून काढून ‘पुडी’ दिली. भरत गोगावलेंनी ती ‘पुडी’ घेतली, पण ही दृश्य कॅमेरात कैद झाली. या व्हिडिओवर देसाईंनी स्पष्टीकरण दिले.
शंभूराज देसाई यांनी दिलेली ही पुडी नेमकी कशाची यावरुन आता चर्चा सुरू झाल्याने देसाई यांनी सुरुवातीला माध्यमांशी संवाद साधत साधक बाधक प्रतिक्रिया दिली. आपण गोगावलेंना काय दिलं? हे आपल्यालाही माहित नाही. खिशातला एखादा कागद गोगावले यांना दिला असेल, ते मी बघतो पण नियम मोडणारं कोणतंही कृत्य माझ्याकडून झालं नाही.
मूळात मी तंबाखू खात नाही, ना भरतशेठ खातात… माझाकडे मसाला इलायची होती. जी मी घसा कोरडा होतो; म्हणून खातो. ती भरतशेठ यांनी मागितली आणि मी दिली. मी सभागृहात गेली अनेक वर्ष बसतो. सभागृहाचे नियमही मला माहीत आहेत. मी चूक केलेली नाही. मी तंबाखू खात नाही, असे शंभूराज देसाई यांनी म्हटलं.
नेमका काय घडला प्रकार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बुलेट प्रकल्पाबाबत महत्वपुर्ण माहिती सभागृहाला देत होते. यावेळी मागच्या बाकावर बसलेले मंत्री शंभूराज देसाई यांनी खिशातील पुढी काढत पाठीमागे बसलेल्या आमदार भरत गोगावले यांना दिली. या पुढीतील ‘खाद्य’ हातावर मळून गोगावले यांनी तोंडात टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा ही पुडी शंभूराज देसाईंना परत केली होती. देसाईंनी ही पुढी इतर आमदारांना देण्यासाठी पुढे केली होती. हा प्रकट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.