सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सत्ता भांग पिल्यासारखी असते अंगात आलि की माणुस डुलायला आणि नाचायला लागतो, मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती. यावरून आता शंभूराज देसाईंनी सदाभाऊंवर पलटवार केला आहे. सदाभाऊ स्वतःच भांग पित असतील यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी सदाभाऊंवर निशाणा साधला. सदाभाऊच भांग पित असतील यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केलय. पण त्यांच्या पदयात्रेवेळी आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती सर्व प्रशासनाला योग्यते आदेश देण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर आणि ऍम्ब्युलन्स या सर्वाना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या असं शंभूराज देसाई म्हणाले.
सदाभाऊंनी मोर्चा काढू नये, उन्हाचा त्रास होईल म्हणून आम्ही त्यांना विनंती करत होतो परंतु त्यांनी ऐकलं नाही. सदाभाऊंना भेटायची माझी इच्छा होती पण त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा होता, तसेच राज्यपालही साताऱ्यातून रत्नागिरीला रवाना झाले त्यांमुळे मी तिकडे गेलो असं शंभूराजेंनी स्पष्ट केलं. मी जरी इथं नसलो तरी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सदाभाऊ यांच्या संपर्कात होते असेही त्यांनी म्हंटल.