आत्ताचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे, त्यांना हवाई सफर आवडत नाही; शंभूराज देसाईंचा नाव न घेता ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. तसेच आत्तापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता त्यापेक्षा जास्त आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळेल असेही शंभूराज देसाई यांनी म्हंटल. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प, डोगरी तालुके, पर्यटन, औद्योगीक प्रगतीसह अन्य विकास आराखड्याचा समावेश असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल. एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे असून ते सुद्धा डोंगरी भागातील आहेत आणि मी पण डोंगरी भागातील आहे. आत्ताचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावत आत्तापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता त्यापेक्षा जास्त आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळेल असेही शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

उत्पादन शुल्क खाते हे राज्याला उत्पन्न मिळवून देणाऱ्या पहिल्या ५ खात्यांमध्ये येत. आत्ता मार्च एन्ड ला जे वर्ष संपलं त्या वर्षअखेर माझ्या खात्यामार्फत साडे अठरा हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीला जमा झालं होत. गणपती नंतर मी सविस्तर माझ्या खात्याबाबत काही नव्या सूचना सचिवांना देऊन राज्याचे उत्पन्न वाढवण्यावर माझा भर असेल असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अजून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नेमलेले नाहीत. पण पालकमंत्री नसले तरी कोणत्याही जिल्ह्यातील काम थांबलेलं नाही. प्रत्येक जिल्ह्यावर मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या बारीक लक्ष असून पालकमंत्री पदाबाबत ते लवकरच चर्चा करतील असेही शंभूराज देसाई यांनी सांगिले