सातारा । पहिल्या काळात जसे पोपटाच्या चिठ्ठी वरून भविष्य बघायचे. त्यातील संजय राऊत म्हणजे चुकीची चिट्टी काढून भविष्य सांगणारा पोपट आहे, अशा शब्दात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. सातारा येथे माध्यमांशी शंभूराज देसाई बोलत होते.
संजय राऊत कायम म्हणतात, ३ महिन्यांनी असं होणार, १५ दिवसांनी तस होणार, परंतु आजपर्यंत त्यांचं सगळं खोटं ठरलं. पण माझा अजून त्यांच्यासारखा हात बघायचा अभ्यास झालेला नाही. पहिल्या काळात आम्ही लहानपणी बघायचो, कि एक पोपट चिट्ठी काढायचा तसा संजय राऊत हा चुकीची चिट्ठी काढणारा पोपट आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.
दरम्यान, शरद पवारांच्या सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः गेले होते त्यावरूनही शंभूराज देसाई यांनी निशाणा साधला. यापूर्वी, केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय पक्षाचे नेते मातोश्रीवर साहेबांचे वाट बघत असायचे पण आता त्यांचे वारसदार मातोश्रीवरून सिल्वर ओकच्या पायऱ्या चढत गेले हे आश्चर्य कारक असून यामागील कारण माध्यमांनी शोधलं पाहिजे असं शंभूराज देसाई म्हणाले. मे 2022 पर्यंत आम्ही सर्व 56 आमदार उद्धव ठाकरेंसोबत होतो आमचे संख्याबळ असल्यामुळे महाविकास आघाडी बनवण्यासाठी इतरांना मातोश्रीवर यावे लागत होते. लोकशाहीमध्ये संख्या बळाला महत्त्व आहे आज संख्याबळ घटलं, आपल्या जवळचे विश्वासू आमदार खासदार निघून गेले की काय वेळ येते ती कदाचित आज उद्धव ठाकरे यांच्यवर आली त्यामुळे त्यांना सिल्वर ओकवर जावं लागलं असा टोला शंभूराज देसाई यांनी म्हंटल.