नांदेड प्रतिनिधी । देशभरात सामूहिक बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाही आहेत. समाजात आजही महिला पुरुषांच्या अत्याचारांना बळी पडत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बिलोली तालुक्यात गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ४ नराधम शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेत पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात ४ नराधम शिक्षकानंविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर असलेल्या साईबाबा विद्यालयात या घटनेतील पीडित विद्यार्थिनी शाळेत शिकते. याच शाळेत शिकवणाऱ्या सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके या शिक्षकांनी सहावीत शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार केला. या शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमी अवस्थेत या पीडितेने घडलेल्या सारा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतले. या घटनेतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या चारही नराधम शिक्षकांवर पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या घटनेत त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
हे पण वाचा –
साखरपुडा झालेल्या तरुणीचे प्रियकराने मोटारसायकलवर येऊन केले अपहरण
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार
तीन वर्षाच्या बालिकेवर आत्याच्या नवर्याकडून बलात्कार