गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार; ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह पुन्हा गुवाहाटी दौऱ्यास रवाना झाले. ठीक दहा वाजता त्यांच्यासह त्याचे कुटूंबियही गुवाहाटीला गेले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून शिवसेना गटाच्या नेत्याने निशाणा साधला आहे. “शिंदे गटाचं हिंदुत्व लोकांना आणि गुवाहाटीच्या कामाख्या देवीलाही मान्य नाही. त्यामुळे गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असा दावा शिवसेना ठाकरेगटाचे नेते शरद कोळी यांनी केला आहे. तसेच त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही टीका केली आहे.

शिवसेना ठाकरेगटाचे नेते शरद कोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सूरतमार्गे शिंदेगटाचे सगळे आमदार गुवाहाटीला गेले. तिथे एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गोवा मार्गे सगळे आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र तेच हिंदुत्व आज त्यांनी खुंटीला टांगलं आहे. गुवाहाटी वरून परत आल्यानंतर शिंदे भाजप सरकार पडल्याशिवाय राहणार नाही,

शहाजी बापूंबद्दल सांगायचे झाले तर शहाजी बापूंचं तोंड गटारीसारखे आहे. त्यामुळे ते संजय राऊतांवर टीका करत असतात. शाहजीबांपूनी बुडाखालचा अंधार बघावा आणि मग इतरांना बोलावं, असे कोळी यांनी म्हंटले.