राष्ट्रवादीचे नेते शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांची सेनेच्या एका बड्या मंत्र्यांशी गोपनिय बैठक झाली असून प्राथमिक चर्चा केली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येत असल्याने लाड हे सेनेमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा खिंडार पडण्याची भीती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेना स्वबळाची तयारी करताना दिसत आहेत. शिवसेना सध्याच्या घडीला आघाडीवर आहे. भाजपवर त्यांचा भरवसा राहिला नाही, म्हणूनच सेनेने स्वबळाच्या दृष्टीने निवडणुकीची तयारी चालवली आहे.

प्रमुख घराणी व प्रमुख नेत्यांना गळाला लावण्याचा सपाटा लावला आहे. कुंडलचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणअण्णा लाड यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हे सेनेच्या संपर्कात आहेत. शिवेसनेकडून लाड यांना विधानसभेबाबत विचारणा झाली असल्याचे समजते.

हे पण वाचा –

अजित पवारांना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; भाजपच्या या नेत्याने घेतली महत्वाची बैठक

प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसाठी कॉंग्रेस समोर ठेवला ‘हा’ फॉर्म्युला

एका ट्वीटने गंभीरनं केली आफ्रिदीची बोलती बंद!

तर भारताने समुद्री मार्ग बंद करावा – सुब्रमण्यम स्वामी

मुख्यमंत्र्यांनी पक्ष बदलाचा बाजार मांडलाय – जयंत पाटील

Leave a Comment