हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुजरात गाठल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळु शकत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गृहखात्याला धारेवर धरले आहे. शिवसेनेचे एवढे आमदार आणि मंत्री रातोरात गेले तरी कळलं कस नाही? असा सवाल पवारांनी गृहमंत्र्यांना केला आहे.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी त्यानी गृहखात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे एवढे आमदार आणि मंत्री रातोरात गेले तरी कळलं कस नाही? असा सवाल पवारांनी वळसे पाटलांना केला आहे.
दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज फोनवर चर्चा झाली असून लवकर ते भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे आता सरकार वाचवण्यासाठी पवार काय पाऊले उचलतात हे पाहावे लागेल.