हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली.यावेळी अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनितीबाबत चर्चा केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली.
“मराठा आरक्षणावरील स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत. त्याची माहिती या बैठकीत शरद पवारांना दिली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही याबाबत आपली मतं मांडली. सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे. त्याची तयारी सुरू आहे. त्याबाबत शरद पवारांशी चर्चा केली,” असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’