पवार साहेबांचा गेम कोणी केला असेल तर तो अजित दादांनीच केला – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात खूप मोठं राजकीय नाट्य घडलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीची स्थापना करून सत्ता स्थापने बद्दल चर्चा करत असतानाच अचानक राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भल्या पहाटे शपथविधी घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला धक्का दिला. परंतु आमदारांचा पाठिंबा नसल्याने अजित दादा राजीनामा देऊन स्वगृही परतले होते.

परंतु, याच घटनेवरून शिवसेना अधून मधून भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असते. त्यातच भाजपचे निलेश राणे यांनी याच घटनेवरून शिवसेनेला टोला लगावत थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे.या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे.

शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला. अस निलेश राणे म्हणाले.

निलेश राणे यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like