हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आल्यांनतर सुद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणावर ठाम आहेत. मात्र मराठा आंदोलनात फूट पडली असल्याचे दिसत आहे. कारण काल मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि किर्तनकार असलेले अजय महाराज बरासकर यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे (Sangita Wankhede) यांनी जरांगे पाटलांवर मोठा आरोप केला आहे. मनोज जिरंगे पाटील हे शरद पवारांचं ऐकतात असं सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संगीता वानखेडे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेडं बनवलंय. खरं तर मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हतं. पण आता त्यांना मीडियाची सवय लागलीय. गे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी मनोज जरांगे यांच्यावर विश्वास ठेवला होता. एवढच नव्हे तर जरांगेची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोलही केलं होतं, तेव्हा ते लोक मला गलिच्छ भाषेत बोलत होते. पण स्वतःसाठी ते आंदोलन करत असून आता सरकारनं आरक्षण दिलेलं असतानाही त्यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. ज्यासाठी लढा उभा केला होता, ती मागणी पूर्ण झालीय. असं असताना मीडिया जिवी झालेला हा माणूस आता आंदोलन करत आहे.
त्या पुढे म्हणाल्या, मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. मात्र शरद पवार (Sharad Pawar) जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. जरांगे पाटलांच्या सभेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्येच होते असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे मराठा आंदोलनात आता फूट पडली असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कालच महाराज बरासकर यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता २४ तास उलटतेत तोच जरांगे यांच्यावर दुसरा गंभीर आरोप करण्यात आलाय.