हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असेल हे अगदी चुकीचे आहे. 300 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाच्या विरुद्ध लढलेल्या निवडणुकीचा निकाल काय असू शकतो हे मला माहित आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
प्रशांत किशोर मला दोनदा भेटले, पण आम्ही त्यांच्या एका कंपनीबद्दलच बोललो. 2024 च्या निवडणुका किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नेतृत्वाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. प्रशांत किशोर यांनी मला सांगितले की त्यांनी निवडणुकीची रणनीती आखण्याचे कार्य सोडले आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुका असोत की राज्य निवडणुका. निवडणूका फार दूर आहेत, राजकीय परिस्थिती बदलतच आहे. 2024 च्या निवडणुकीत कोणाला नेतृत्व मिळेल याबाबत भाष्य करता येणार नाही असेही त्यांनी म्हंटल.