अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी, शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन!

eknath shinde sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली.

श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे अशा शब्दांत शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे यांच्यासोबत तब्बल 51 आमदारांचे समर्थन होत. अखेर भाजपसोबत त्यांनी सत्तास्थापन केली असून आज रात्री ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.