हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षबदल करून भाजप मध्ये गेलेल्या पिचड बाप – लेकांवर निशाणा साधला. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केले. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला शरद पवार यांनी पिचड यांना लगावला.
राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली त्यावेळी जनतेच्या मनातल कळालं होते. जनतेला परिवर्तन हवं होते ते झालं आहे, असं शरद पवार म्हणाले.
अकोल्यातला अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याचं मला कळालं. कारखान्यावर 200 कोटीचं कर्ज झालं आहे. जे या कर्जाला जबाबदार आहे त्या शुक्राचार्यांना बाजूला करा, कारखाना चालवण्यासाठी सर्व ती मदत मी करतो”, असं म्हणत पवारांनी पिचडांवर टीका केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’