व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांना अजित पवारांवर विश्वास नाही : केंद्रीयमंत्री

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
अजित पवार यांच्यावर त्यांचे काका भरोसा ठेवत नाहीत. राष्ट्रवादी काॅंग्रेस महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्याला देणार होते, मात्र, धमकीमुळे ते अजित पवारांना मिळाले. मुख्यमंत्री पदासाठी ते समजतो करणारे लोक आहेत. धर्मासाठी बलिदान देणारे संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणत नाहीत, अशा लोकांवर मी काय बोलावे, राहुल गांधींवर काय बोलावे अशी असा हल्लाबोल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला. भाजप दबावतंत्राचा वापर करत असल्याच्या अजित पवार यांच्यावर वक्तव्यावर श्री. मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना-२ अंतर्गत आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पस येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सातारा लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणी प्रमोद जठार, विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील आदी उपस्थित होते. कृष्णा कॅम्पसमध्ये मंत्री अजयकुमार मिश्रा यांचे स्वागत डाॅ. सुरेश भोसले यांनी पुष्पगुच्छ देवून केले.

अजयकुमार मिश्रा म्हणाले, भाजपाकडे जे कार्यकर्त्याचे संघटन आहे, ते कोणत्याही पक्षाकडे नाही. सातारा जिल्ह्यात डाॅ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वात भाजपा अत्यंत मजबूत असून तालुकाध्यक्षापासून बुथपर्यंत चांगले काम आहे. भाजपा ऐवढा कोणताही पक्ष सातारा जिल्ह्यात मजबूत नाही. डाॅ. अतुल भोसले हे आमचे नेते असल्याचेही यावेळी श्री. मिश्रा म्हणाले.

उध्दव ठाकरे यांच्यावर टीका 
महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार आले आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी काही लोकांनी विरोधात निवडणूक लढवली त्याच्यांशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे 5 ते 10 वर्षे महाराष्ट्र विकास कामात मागे पडला आहे. महाविकास आघाडीने गतिरोधकाप्रमाणे काम केले आहे, असल्याची टीका अजयकुमार मिश्रा यांनी केली.

भारत जोडो यात्रेवर टीका
भाजपाचा कार्यकर्ता कधीच घरी बसत नाही. काॅंग्रेस कधी- कधी रॅली काढतात, असे म्हणत भारत जोडो यात्रेवर टीका केली.