हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पारनेरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र पवारांच्या या दौऱ्याला कारखाना बचाव आणि पुर्नर्जीवन समितीने विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री पारनेरच्या रस्त्यावर “शरद पवार-गो बॅक’ असं लिहिण्यात आलं आहे.
पारनेर येथील निघोज येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र पवारांच्या या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला. कारखान्याच्या विक्रीत पवारांचा हात असल्याचा आरोप समितीकडून कऱण्यात येत आहे. त्यामुळे कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. तसेच जवळे ते देवीभोयरे रस्त्यावर ‘शरद पवार-गो बॅक’ असे लिहून कारखाना बचाव समितीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
या आंदोलनाला भुमिपूत्र शेतकरी संघटना, भीम आर्मी , अन्याय निर्मुलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनांनी देखील पाठींबा दिला आहे. सामाजिक संघटनांच्या पाठींब्यामुळे आंदोलनाची धार बळकट होत असल्याचे दिसताच प्रशासनाने आयोजक व आंदोलकांत मध्यस्थी करण्याची भुमिका घेतली . यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले