मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांचाच; देवेंद्र फडणवीसांच मोठं वक्तव्यं

Pawar And Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे मराठा समाजाने सरकार विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. सध्या राज्यात या सर्व घडामोडी घडत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. कारण, आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे.

आज नागपुरात भाजपच्या प्रदेश पदाधिकारांच्या बैठकीत बोलताना “मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वाधिक विरोधी शरद पवारांनी केला” असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मोठमोठी आंदोलने सुरू आहेत. मात्र आपण मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास काढून पाहिला तर लक्षात येतं की, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केला आहे असे दिसते”

तसेच पुढे बोलताना, “महाविकास आघाडी सरकार असतानाही आपण सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य ऐकलं होतं की मराठा आरक्षणापेक्षाही राज्यात इतर मोठे प्रश्न आहेत. शरद पवारांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाही मराठा आरक्षण देता आलं असतं, पण पवारांना कधी मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना दोन समाजांना झुंजवत ठेवायचं होतं. लोकं झुंजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल, असं त्यांचं राजकारण आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

इतकेच नव्हे तर, “मराठा आरक्षण देण्यासाठी आपली कमिटमेंट पक्की आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. मात्र हे आरक्षण देताना आपण ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी ओबीसी आरक्षणावर संकट येऊ देणार नाही,” असा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला दिले.