हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या हस्ते कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताला कर्नाटकातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं देखील उद्घाटन करण्यात येणार आहे.
शरद पवार कर्नाटकात पोचताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंगळुरू येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 2023 साली कर्नाटकात विधानसभा निवडणुक होणार असून त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कर्नाटकात लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी यावेळी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात आघाडी करणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे.
Karnataka Congress President DK Shivakumar meets NCP Chief Sharad Pawar on his arrival at Bengaluru airport
Pawar is scheduled to inaugurate the NCP office at Banaswadi in Bengaluru today. pic.twitter.com/2gqvupHFqr
— ANI (@ANI) April 18, 2022
कर्नाटकातही मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील भागात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभे करू शकतो. पवारांनी प्रामुख्याने या भागावर लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या कर्नाटक दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्नाटकात सध्या भाजप सत्तेत आहे तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे.