हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण देशभरातून भाविक मुंबईतील लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनाला येत असतात. सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि बाप्पासमोर नतमस्तक होत असतात. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे उपस्थित होत्या. शरद पवारांनी अनेक वर्षानंतर लालबागच्या राजाला आले. त्यापूर्वी त्यांनी सकाळी चिंचपोकळी चिंतामणीचेही दर्शन घेतलं.
आज सकाळी गणपतीच्या तिसऱ्या दिवशी, शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारात गेले आणि गणरायाचा आशीर्वाद घेतला. . यापूर्वी मुख्यमंत्री असताना शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते, त्यानंतर आज त्यांनी लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतले.कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळानं केलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मंडळाच्या वतीनं गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं.
दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा मुंबईत असून आज लालबागच्या राजाच्या चरणी लीन होणार आहेत. आज दुपारी १२ वाजता अमित शाह लालबागच्या राजाच्या दरबारात जाणार आहे. त्यांच्याआधीच शरद पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सुद्धा आधीच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.