पुणे | मयुर डुमने
मॅक्सझीम गॉर्की सारखा डाव्या विचारांची मांडणी करणारा विचारवंत जगातल्या अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला त्या प्रेरणेने प्रभावित होऊन काम करणारे जे कर्तृत्ववान लोक होऊन गेले ज्यांनी आपल्या लेखणीचा आणि वाणीचा उपयोग उपेक्षित लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी केला त्या मध्ये प्रामुख्याने अण्णाभाऊं साठे यांचा समावेश करावा लागेल , अण्णाभाऊंनी प्रचंड लेखन केले त्या सर्व लेखनाचा केंद्रबिंदू हा उपेक्षित माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हाच होता असं मत खा शरद पवार यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेल्या फकिरा कादंबरीचे इहवादी मूल्यमापन आणि आंबेडकरवादी प्रतिभावंत या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पी डी पाटील, खासदार वंदना चव्हाण, ललिता सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पुस्तकाचे लेखक श्रीपाल सबनीस म्हणाले की ,”झोपडपट्टीतील वेदना , दलितांची वेदना आणि कामगारांची वेदना बाजूला ठेऊन निर्माण झालेल साहित्य हे वांझ साहित्य आहे , बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार जर धर्मांध शक्तीला शरण जात असतील तर आंबेडकरवादाच अस्तित्व धोक्यात आल आहे अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरवादी प्रतिभावंतांनी आपली अस्मिता जपण आणि ती अण्णाभाऊ साठेंच्या बेरजेत उभी करणं ही काळाची गरज आहे”
“सर्वंकष दलित चळवळ उभी राहिली पाहिजे आणि सगळ्या जातीचे लोक एकत्र आले पाहिजे अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीचे मूल्यमापन आणि आंबेडकरवादी प्रतिभावंत या दोन पुस्तकाचं मिश्रण आमच्यातला सुद्धा वाद नष्ट केला पाहीजे असा संदेश देऊन जाते” असं मत व्यक्त करून सुशीलकुमार कुमार शिंदे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक भगवानरावजी वैराट यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला.