अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व असल्याच मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनी व्यक्त केले. ते दौंड येथील कार्यक्रमात बोलत होते. दौंड येथे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन सहाय्यक वैद्यकीय उपकरणांचे मोफत वितरण करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सर्व समाजघटकांच्या विकासाचं जे काम हाती घेतलंय, त्याचीच एक छोटीशी झलक आज या कार्यक्रमातून दिसली. सत्ता ही अशीच अडचणीत असलेल्या लोकांसाठी वापरायची असते. या सरकारचे हेच तत्त्व आहे. गरजू व्यक्तींच्या जीवनात स्थैर्य प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे.

याप्रसंगी बोलताना पवार यांनी दौंड तालुक्याच्या विकासाविषयी भाष्य केले. त्यांनी म्हंटले, दौंड तालुक्याचे रूप आता पालटलेय. कधी काळी दुष्काळी भाग असलेल्या या तालुक्यात पाणी आले आहे. यामुळे अनेकांना शेतीमध्ये फायदा झाला. शेतीला कारखान्याची जोड दिली तर यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतो. प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी असे धोरण राज्य सरकारने आखले पाहिजे.

पवारांनी आपल्या भाषणात दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष्य वेधले. त्यांनी म्हंटले, आपला समाज खूप मोठा आहे. त्यात अनेक घटक अंतर्भूत आहेत. यातील दिव्यांग हा एक घटक, जो शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्याच्याकडे समाजाचे दुर्लक्ष होतेय. त्यामुळे सरकारने अशा व्यक्तींसाठी उपक्रम राबवून त्यांना समाजात सन्मानाने जगता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

Leave a Comment