शरद पवार राष्ट्रपती? : प्रशांत किशोर यांची दिल्लीत तिसऱ्या आघाडीतून राजकीय फिल्डिंग सुरू

sharad pawar prashant kishore 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | देशात मोदीच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झालेली आहे. राजनितीकार प्रशांत किशोर यांच्या विरोधकांची मोट बांधण्याच्या भेटीने अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. यामध्ये एका वृत्तवाहिनीने वृत्त दिल्याने शरद पवार यांPना 2024 मध्ये तिसऱ्या आघाडीतून राष्ट्रपती बनण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.

प्रशांत किशोर विरोधकांना एकत्र आणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती बनविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. पुढील वर्षी 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या पदासाठी शोधमोहिम हाती घेतलेली आहे. अशातच 2024 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केल्याची पहायला मिळत आहे. सर्व विरोधक एकत्र आल्यास मोदी सरकारच्या विरोधात एक मोठे आव्हान उभे करू शकतात. नविन पटनायक विरोधकांच्या सोबत येतील असे बोलले जात आहे कारण शरद पवारांशी त्यांचे संबंध हे काैटुंबिंक आहेत.

प्रशांत किशोर यांनी प्रियांका गांधी व राहूल गांधी यांची भेट घेतली आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात सत्तेत असणारे सरकारच्या विरोधातील पक्षाचे प्रमुखांना प्रशांत किशोर हे सगळ्या नेत्यांना एकत्र आणू शकतात, सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबध आहेत. सध्या प्रशांत किशोर हे काॅंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची हालचाल सुरू आहे. त्यामुळे 2024 मध्ये शरद पवार यांना राष्ट्रपती बनविण्याच्या चर्चां राजकारणात सुरू आहेत. मात्र अद्याप राष्ट्रवादी पक्ष किंवा खुद्द शरद पवार यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.