‘शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी यावेळी निकष बदल करणे गरजेचे’- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
उस्मानाबाद । राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ”शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे,” अस मत शरद पवार यांनी दौऱ्यात व्यक्त केलं. “शेतकऱ्यांनी काढून ढीग केलेलं सोयाबीन वाहून गेले. त्यांना सुद्धा मदत करणे गरजेचे आहे, शेती वाहून जाणे, सध्या वाहून गेलेल्या पिकांना मदत करण्याची तरतूद नाही, मात्र, निकष बदल करणे गरजेचे असल्याचं मत शरद पवारांनी मांडले.”
पीक विम्याच्या नियमात बदल करावे
“पीक विमा ऑनलाईनला शिथीलता द्यावी. पीक विम्यासाठी निकषांच्यानुसार फोटो अपलोड करणे शक्य नाही. मी स्वतः फोटो अपलोड करु शकत नाही,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही
“नदी ओढयाकाठी असलेल्या विहिरी, मोटारी वाहून गेल्या आहे. जनावरे वाहून गेली आहेत. घरांचे नुकसान झाले. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले असून सोयाबीन कुजले, वाहून गेले आहेत. काही जिल्ह्यात नुकसानीची टक्केवारी जास्त आहे. तसेच मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.
मदतीसाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे
“पाऊस जास्त झाल्यामुळे उसाची लागण यावर्षी मोठ्या प्रमाणात होईल असे दिसते, यंदा उसाचेही नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखाने सुरू झाले पाहिजेत. सध्या राज्यावर मोठे आर्थिक संकट आहे. त्यामुळे कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे,” अशी विनंती शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”