Sunday, February 5, 2023

बांधावर जाऊन फोटो तुम्ही काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?? ; निलेश राणेंचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. राज्याबरोबरच केंद्रानेही मदत केली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी मांडलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, असं सांगितलं. मात्र, यावर निलेश राणे यांनी टीका केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता असं झालंय, महाविकास आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार”, असा चिमटा निलेश राणे यांनी काढला.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील दिग्गज नेते पाऊस नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांचा मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. शेतीच्या बांधावर जाऊन शरद पवार शेतकऱ्यांना धीर देत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’