मोतोश्रीवर जाण्यात मला कमीपणा वाटत नाही; पवारांनी चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ सल्ल्याला दिला खो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असताना आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यात महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात खरंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटायला जायला हवं असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावर शरद पवार यांनी मोतोश्रीवर जाण्यात मला कमीपणा वगैरे काही वाटत नाही, असे म्हणतं चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याला खोचक उत्तर दिलं.

शरद पवार म्हणाले कि, ”चंद्रकांत पाटलांना काही वाटत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. तुम्ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या मुलाखतीची चर्चा आहे ती मुलाखत देण्यासाठी मी त्याच भागात गेले होतो. तिथून फर्लांगभर अंतरावर मातोश्री निवासस्थान होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी १४ किलोमीटर लांब माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्याच्याकडे गेलो. त्यात मला कमीपणा वगैरे काही वाटत नाही,” असे पवार म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे. त्यावर पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्या प्रमुख लोकांनी बाहेर पडणं योग्य नाही. ते बाहेर पडल्यास गर्दी होते आणि तेच नेमके टाळण्याची गरज आहे. या आजाराचा तोच मुख्य नियम आहे, असे पवारांनी नमूद केले. काम करण्यासाठी बाहेर पडलंच पाहिजे असे नाही. सध्या कम्युनिकेशनची अनेक साधने आहेत. त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळेच उगाच टीका करणे योग्य नाही, असे पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”