.. म्हणून 2004ला मुख्यमंत्रीपद सोडलं; शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

sharad pawar ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००४ साली काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी होती, मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) अधिकची इतर मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने करत असतात. आता त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर देत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २००४ राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत फार विचापूर्वक निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण, ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रिपदासाठी कोणी योग्य उमेदवार आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदा सोपविले असते, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यामुळे अधिकची मंत्रिपदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो असं पवारांनी स्पष्ट केलं. मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेद केला नाही. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही, ही अजित पवार यांची ओरळ निरर्थक आहे असेही शरद पवार यांनी म्हंटल.

अजित पवार काय म्हणाले होते?

2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपद सोडायला नको होतं ही एक मोठी चूक मला वाटते. त्यावेळी आमच्याकडे छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील असे नेते होते, यातील कोणाला तरी मुख्यमंत्री करायला हवं होते. किंवा वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. मात्र, 2004 मध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी आले असते, तर शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता असं अजित पवार आपल्या प्रत्येक भाषणात सांगत आहेत. आता शरद पवारांनी दिलेल्या या उत्तरानंतर दादा गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.