कोल्हापूर प्रतिनिधी
शरद पवार हे राजकारणातले वाद मिटवण्यात अग्रेसर राजकारणी आहेत. आता पर्यंत अनेक नाराजांची त्यांनी मनधरणी केलेली आहे. महाराष्ट्रातल्या पुतण्यांना आपल्या गोटात ओढायाचं कौशल्य देखील पवारांकडे आहे. ५० वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेल्या पवार यांना आजही राजकारणात मध्यस्थी करण्यासाठी अनेक जिल्ह्यात दौरे करावे लागतात.
लोकसभा निवडणूकीला उधाण आले असताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामागे आघाडीतील बिघाडी दूर करण्याचा प्रयत्न होणार का? याकडे आघाडीसह युतीच्या नेत्यांचे लक्ष आहे. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय वातावरणाने कोल्हापूर जिल्हयातील राजकारणावर गडद सावट दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील जागा टिकविण्यासाठी शरद पवार यांनीच आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा करावी, अशी आघाडीत स्थानिकांंनी वरिष्ठांना सुचवले आहे.
यानुसार शरद पवार व सतेज पाटील यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे परिणाम पुन्हा विधानसभा निवडणूकीत उमटू नयेत, याचीही दक्षता घेतली जाणार.