चित्रपटाच्या माध्यमातून देशात द्वेश भावना पसरवण्याचा प्रयत्न; पवारांचा भाजपवर घणाघात

0
43
Pawar modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुनः एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. चित्रपटाच्या आधारावर देशातील वातावरण विषारी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप शरद पवार यांनी केला. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत आहे . शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते. असे पवारांनी म्हंटल.

काश्मिरी पंडितांना जेव्हा घाटी सोडावी लागली तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान होते. वीपी सिंह यांचे सरकारचे भाजपकडून समर्थन करण्यात येत होते. मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री होते आणि जगनमोहन ज्यांनी नंतर भाजपकडून उमेदवारी मिळवत दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. जमगनमोहन तेव्हा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते ही आठवणही पवारांनी करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here