सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शरद पवार यांनी मानले आभार; ‘महाविकासआघाडी’ तर्फेही स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाचे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. आज असलेल्या संविधान दिनाच्या दिवशी न्यायालयाच्या या निर्णयाने लोकशाहीचा व भारतीय संविधानाचा विजय झाला अशी प्रतिकिया महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले व पुढील शब्दात न्यायालयाचे आभार देखील मानले, “राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगाने संविधान दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे.”

खासदार सुप्रिया सुळे हा निर्णय खूप सुंदर व गोड असाच आहे. त्या म्हणतात, “संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे.हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड.२४ तास,थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल. सत्यमेव जयते.जय हिंद,जय महाराष्ट्र.”

शिवसेना नेते संजय राऊत यांनी “सत्य परेशान हो सकता है.. पराजित नही हो सकता…” अशा शब्दात निर्णयाचे स्वागत केले. तर काँग्रेस व शिवसेना पक्षाने, “सत्यमेव जयते! आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांची आघाडी लवकरच बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल.” अशा शब्दात या निर्णयाचे स्वागत केले.









Leave a Comment