भारताने सामना कुठं फिरवला? शरद पवारांनी सांगितला टर्निंग पॉईंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (IND Vs SA T20 Final) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप वर आपलं नाव कोरल. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. एकवेळ भारत हा सामना हरेल असं वाटलं होते. दक्षिण आफ्रिकेला २२ चेंडूत २६ धावांची आवश्यकता होती, मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत अभिनंदन केलं तसेच मॅच कुठे फिरली याचा टर्निंग पॉईंट सुद्धा सांगितला.

काय आहे शरद पवारांचे ट्विट?

शेवटचा थरार! १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा अभिमानाचा क्षण. धन्यवाद रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवचा झेल…. अभिनंदन असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे. म्हणजेच सूर्यकुमार यादवने अखेरच्या ओव्हर मध्ये डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल मॅच चा टर्निंग पॉईंट ठरला असं पवारांनी म्हंटल. शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पंड्या ओव्हर टाकत होता तर समोर डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिलाच बॉल मिलरने लॉन्ग ऑन च्या दिशेने हवेत मारला, असं वाटलं कि हा चेंडू सहज सिक्स जाईल, पण सुर्यकुमार यादवे चतुराईने तो कॅच पकडला आणि भारताचा विजय सुनिश्चित झाला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा वर्ल्डकप जिंकावा अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा होती. मात्र हेन्री क्लासेनच्या वादळी खेळीने एकवेळ दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २२ चेंडूत २६ धावांची गरज होती. मात्र हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी टिच्चून बॉलिंग करत आफ्रिकेला विजयापासून रोखलं आणि ऐतिहासिक विजय मिळवत वर्ल्डकप चॅम्पियनचा खिताब मिळवला. जसप्रीत बुमराह मन ऑफ द टूर्नामेंट ठरला.