नांदेड प्रतिनिधी | नांदेड मध्ये महाआघाडीच्या मित्र पक्षाची पहिली संयुक्त प्रचार सभा पार पडली. या मित्र पक्षात काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस-पीआरपी-रिपाई गट,शेकाप व सीपीएम हे उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार बोलत असताना त्यांनी नरेंद्र मोदींवर पुलवामा हल्ल्यावरून चांगलीच खरडपट्टी काढली.
दहशतवादी घटनेनंतर काँग्रेस सरकार व्यवस्थित परिस्तिथी सांभाळत होते, मोदींना मात्र ते जमत नाहीये.गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली तेव्हा सर्व उपस्थित होते, पण मोदी मात्र प्रचारात गुंग झाले होते. छप्पन इंच छाती असताना रोज जवान मारले जात आहेत,अशी टीका शरद पवार यांनी मोदींवर केली.नोटाबंदी करताना दहशतवाद संपून जाईल असे मोदी म्हणाले होत, मात्र नोटा बंदी होऊन किती काळ उलटला तरी दहशतवाद संपला नाही. मग या नोटबंदीचा उपयोग तरी काय? नोटबंदीमुळे फक्त लोकांना त्रास झाला, गरिबांचा पैसे गेला. नोटबंदी नंतर दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
जीएसटी सारख्या करामुळे व्यापारी उद्वस्थ झाले.मोदी सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक केली. राफेल प्रकरणी मध्ये ५०० कोटी वरून १५०० कोटी कसे झाले.असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला.
इतर महत्वाचे –
भारत-पाक समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग ‘संवाद’ – सौदीचे राजपुत्र