बीड ते तासगाव… पवारांचे हे 13 चेहरे यंदा फिक्स आमदार होतायत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात टप्प्यात कसा कार्यक्रम करायचा? ते पवारांना पक्क ठावूक… म्हणूनच नवा पक्ष नव चिन्ह,… आणि नवी फळी असतानाही शरद पवारांनी 80 च्या स्ट्राईक रेटने लोकसभेचे मैदान गाजवलं… खासदारकीला महायुतीला आणि विशेषतः अजितदादा गटाला पाणी पाजल्यानंतर आता शरद पवारांचं नेक्स्ट मिशन आहे ते विधानसभा 2024. यंदा काहीही झालं तरी सत्तेत येणारच! असा प्रण केलेल्या शरद पवारांनी विधानसभेची घोषणा होण्याच्या आधीच अनेक उमेदवारांची तिकीट डिक्लेअर करून टाकलीयेत… त्यातही तुतारीच्या बाजूने सध्या असे काही खंदे 13 चेहरे आहेत ते अगदी डोळे झाकून निवडून येतील… अशी राजकीय परिस्थिती आहे… त्यामुळे शरद पवारांच्या आमदारांचा आकडा वाढता असला तरी पवारांचे कोणते 13 राजकीय नेते डोळे झाकून निवडून येतील… तुतारीचे हे अनबिटेबल टॉप 13 चेहरे नेमके कोण आहेत? त्याचाच हा सविस्तर आढावा…

शरद पवारांचा कुठला उमेदवार डोळे झाकून निवडून येईल? याचा जेव्हा आपण आढावा घ्यायला जातो, तेव्हा आपसूकच पहिलं नाव समोर येतं ते इस्लामपूरचे जयंत पाटील… इस्लामपुरात वन मॅन शो जयंत पाटलांचं राजकारण चालतं… 1990 पासून तब्बल तीन दशकं ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आले आहेत…मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षांची सत्ता भाजपने संपुष्टात आणली.. हा पाटलांसाठी मोठा धक्का होता…त्यासोबतच अजित पवार गटापासून ते स्वाभिमानी पर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे… पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचंच पारड सध्या तरी जड दिसतय…यातलं दुसरा नाव आहे ते तासगावच्या रोहित पाटलांचं…पवारांनी एका सभेत आधीच तासगाव मधून रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर करून टाकलीये… आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार.. २०१९ ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी… शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील य़ांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापीत झालं.. आमदारकीसाठी त्यांची तयारीही झा्लेली असून ते कवठे महांकाळ मधून ते आरामात तुतारी वाजवतील असं बोललं जातंय…

Beed ते Tasgaon,  हे 13 चेहरे यंदा फिक्स आमदार होतायत । Sharad Pawar | Tutari

तुतारीचा आमदारकीचा तिसरा फिक्स चेहरा म्हणजे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर … बजरंग बाप्पांच्या विजयासाठी बीडात ज्यांनी फिल्डींग लावली होती ते संदीप क्षीरसागर हे या मतदारसंघाचे पहिल्या टर्मचे आमदार.. आपल्याच काकाला म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मात देत संदीप हे विधीमंडळात गेले. पक्षातील आपली पोजिशनही स्ट्रोंग बनवली. यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्याने त्यांचा तुतारीकडून विजय जवळजवळ निश्चित समजला जातोय. यातलं चौथं नाव येतं ते घनसावंगीच्या राजेश टोपे यांचे…पवार साहेबांसोबतच निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकीच एक असणारे राजेश टोपे या मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करतात. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यात कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्रीपद मोठ्या धाडसानं पेलल्यामुळे त्यांची उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती.. सतीश घाटगे, राजू शेट्टी यांची नावं सध्या टोपेंच्याविरोधात चर्चेत असली तरी आमदारकीला टोपे यांच्यापेक्षा सध्या तरी प्लसमध्येच दिसतायेत…

या यादीतला पाचवा उमेदवार असेल तो बिग फाईट बारामती विधानसभेतील युगेंद्र पवार … राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो. पण पक्षफुटीनंतर आता शरद पवार इथून युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करतायत… त्यात अजितदादांच्याच मतदारसंघात तुतारीला ४५ हजारांचं लीड मिळाल्यानं युगेेंद्र पवारांच्या आमदारकीच्या महत्वकांक्षा चांगल्याच वाढल्यात.. त्यामुळे समोर बिग बॉस दादा असताना युगेंद्र पवार इथून तुतारी वाजवण्याचे सध्यातरी फुल टू चान्सेस आहेत…तुतारीकडून आमदारकीचा सहावा चेहरा असेल तो राहुरीच्या प्राजक्त तनपुरे यांचा… 2019 च्या विधानसभेला भाजपच्या शिवाजीराव कर्डीलें सारख्या मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायंट किलर ठरेल… त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांनी लोकसभेलाही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला. त्यामुळे तनपुरेच इथून तुतारी वाजवतील, असं सध्या मतदारसंघातलं जनमत आहे..

सातवं नाव जे आमदारकीसाठी फिक्स समजले जातंय ते कर्जत जामखेडच्या रोहित पवारांचं…2019 च्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार जायंट किलर ठरले. अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत… त्यासोबत भाजपकडून प्रवीण घुले देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजतंय… पण मागील पाच वर्षांत रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये केलेली विकास कामं आणि पक्षबांधणी बघता याही टर्मला त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…या यादीतला आठवा चेहरा येतो तो शिरूरच्या अशोक पवारांचा…शिरुरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादांच्या पाठिशी गेले उरले फक्त निष्ठावान शिरुरचे आमदार अशोक पवार.. त्यामुळे यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील, यात शंका नाही… प्रदीप कंद यांनी पवारांना चितपट करण्यासाठी जोर लावला असला तरी लोकसभेला मिळालेलं लीड, अमोल कोल्हेंची मिळणारी साथ आणि अजित दादांच्या बाजूने असणारे सहानुभूतीची लाट पाहता अशोक पवारांचाच गुलाल यंदा फिक्स दिसतोय

नववं नाव येतं ते काटोळच्या अनिल देशमुख यांचा…महाविकास आघाडीत सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख याच काटोळचं विधीमंडळात प्रतिनीधीत्व करतात… राष्ट्रवादीची दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फळी अजितदादांसोबत गेलेली असताना काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नाव साहेबांसोबत थांबली.. त्यापैकीच एक अनिल देशमुख.. काटोळ हा देशमुखांचा बालेकिल्ला असल्याने ते इथून तुतारी आरामात वाजवतील, असा सध्या ट्रेंड दिसतोय..बोलूयात फायर ब्रँड जितेंद्र आव्हाडांबद्दल… शरद पवारांच्या पाठीशी नेहमीच सावलीप्रमाणे उभे असणारे आव्हाड इथून सलग अनेक टर्म इथून निवडून जातायत.. मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्यांक बहुल सामाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुंब्रा कळव्याला तुतारीचा आवाज ऐकायला मिळेल, यात कसलीच शंका नाही… नजीब मुल्ला कळवा मुंब्र्यातून आव्हाडांना टक्कर देऊ शकतात… पण आव्हाडांच्या आमदारकीला सध्या तरी धोका नाही, असं म्हणता येऊ शकतं…

अकरावा भिडू आहेत पंढरपूरचे भगीरथ भालके…पंढरपूरचे तीन टर्म चे आमदार भारत भालके यांची सुपुत्र भगीरथ भालके… खरतर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी भालकेंना पराभवाचा धक्का दिला… यानंतर त्यांनी बिआरएसची वाट धरली… पण पुन्हा एकदा भगीरथ भालके शरद पवारांच्या वाटेवर आल्याने पोट निवडणुकीचा वचपा भालके यंदा विधानसभेला काढू शकतात… बाकी समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, अभिजीत पाटील यांच्या उमेदवारीचा खल कायम असताना कारखानदारी, संस्थात्मक राजकारण आणि जनसंपर्काच्या जोरावर भालके आरामात पंढरपुरातून तुतारी वाजू शकतात…बारावा चेहरा येतो तो विक्रमगडच्या सुनील भुसारा यांचा… भाजपचा बालेकिल्ला भुसारा यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच ताब्यात घेतला.. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांनाच विक्रमगडची उमेदवारी निश्चित आहे. फक्त भाजपने इथं ताकद लावली तर ही जागा अटीतटीची होऊ शकते… पण भुसारा यांच्याच राजकारणाचं पारडं सध्यातरी जड दिसतंय…

तुतारीचा तेरावा आमदार असू शकतो तो म्हणजे भोसरीच्या अजित गव्हाणे यांचा…अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला. विधानसभा निवडणुक लढवण्याच्या दृष्टीनेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. अजित पवार गटाने आधी – घड्याळ तेच, वेळ नवी असं घोषवाक्य तयार केलं होतं.. अजित गव्हाणे हे भोसरीतून लांडगेंना कट टू कट फाईट देतील, असं सध्या चित्रं आहे… पवारांनी ताकद लावलीच तर अजित गव्हाणे हे शरद पवारांची तुतारीही भोसरीमध्ये वाजवू शकतात, असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे…