मुंबई । भारतीय शेयर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी कारभार सुरु झाल्यानंतर थोडी चढावट पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर सेन्सेक्स १४०० ने घसरला. यावेळी इंडसण्ड बँकेच्या शेअर मध्ये मोठी घसरण झाली.
Sensex slumps by 1311.87 points, currently at 29,267.22 pic.twitter.com/CN7uoHgRrs
— ANI (@ANI) March 18, 2020
बातमी लिहितेवेळी सेन्सेक्स ३०,००० हुन खाली घसरला असल्याचे दिसून आले. यामध्ये बीएचई १४१४ अंकांनी घसरला तर निफ्टी ४१९ अंकांनी घसरली.
दरम्यान इंडसण्ड बँकेच्या शेअर मध्ये मोठी घसरण होत ३७% ने घसरले. शेयर बाजारातील घसरणीमुळे आर्थिक जगतात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.