हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केट मध्ये तुम्ही नवीन असला काय किंवा अगदी व्यावसायिक गुंतवणूकदार अथवा व्यापारी असला काय, तुम्हाला माहितीय कि शेअर मार्केटमध्ये कोणत्याही शेअरची Price हि तीन गोष्टींवर अवलंबून असते. कधी मारकेमध्ये Bullish ट्रेंड पाहायला मिळतो तर कधी Bearish अन कधी कधी neutral सुद्धा. शेअर मार्केटमध्ये काहीही झालं, कोणतीही बातमी आली किंवा मूलभूत वा तांत्रिक गोष्टींमध्ये बदल झाला तरीही किमतींना तेजी, मंदी आणि स्थिर ट्रेंड पाळावा लागतो.
आज आपण या तीन ट्रेंड बाबत थोडक्यात जाणून घेऊयात
तेजीचा कल (Bullish Trend)
तेजीचा ट्रेंड म्हणजे शेअर मार्केट मधील अशी वेळ जेव्हा तुम्हाला एखादा स्टॉक वर जाण्याची म्हणजेच त्या शेअरची किंमत वाढण्याची अपेक्षा असते. अशावेळी तुम्ही तो स्टॉक खरेदी करता. अनेकदा गुंतवणूकदार दीर्घ कालावधीसाठीसुद्धा असे शेअर विकत घेतात.
मंदीचा ट्रेंड (Bearish Trend)
मंदीचा ट्रेंड हा तेजीच्या ट्रेंडच्या अगदी उलट असतो. यामध्ये शेअर मार्केट कोसळण्याची तुम्हाला शक्यता वाटत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडील शेअर विकण्याच्या विचारात असता.
स्थिर ट्रेंड (Neutral Trend)
स्थिर ट्रेंड म्हणजे शेअर मार्केट मध्ये ना तेजी असते ना मंदी. या कालावधीत शेअर मार्केट अगदी एकसंथ सुरु असते.
Stock Option म्हणजे काय?
सोप्या भाषेत ऑप्शनची व्याख्या म्हणजे हा एक असा करार आहे जो ट्रेडरला विशिष्ट स्क्रिप्ट ( स्टॉक किंवा इंडेक्स ) एका ठराविक किंमतीला खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा अधिकार देतो. ऑप्शन मध्ये चार प्रकारे ट्रेड केला जाऊ शकतो. कॉल आणि पुट या दोन्हींमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारे तेजी आणि मंदी ची पोझिशन बनवली जाऊ शकते. Option trading चे दोन प्रकार आहेत, एक Call आहे आणि दुसरा Put आहे. Option trading मध्ये तुम्ही दोन्ही बाजूंनी पैसे गुंतवू शकता. जर तुम्ही Call खरेदी करत असाल; तर तुम्ही तेजीच्या दिशेने पैसे गुंतवत आहात. त्याच प्रकारे जर तुम्ही एखादा Put खरेदी केला तर तुम्ही मंदीच्या दिशेने पैसे गुंतवत आहात.
कॉल खरेदी | CALL BUY करून तेजीचा ट्रेड करणे.
कॉल विकून | CALL SELL करुन मंदीचा ट्रेड करणे.
पुट खरेदी | PUT BUY करून मंदीचा ट्रेड करणे.
पुट विकून | PUT SELL करुन तेजीचा ट्रेड करणे.
Bullish Strategy –
जय तुम्हाला शेअर मार्केट वरती जाणार आहे असे वाटत असेल तर तुम्ही Call Buy करता आणि Put Write करता. यामुळे इन्वेस्टरला नफा होतो.
1) Buying Calls
जेव्हा Invester ला एखाद्या Stock वर तो वरती जाईल असा विश्वास असतो तेव्हा तो Call Buy करतो. यामुळे गुंतवणूकदार भविष्यात सदरील स्टॉक करारातील रकमेमध्ये विकत घेऊ शकतो.
2) Writing Puts
जेव्हा Invester ला एखाद्या Stock स्ट्राइक प्राईसच्या खाली येणार नाही असे गृहीत धरून काम करतो तेव्हा तो Put write करतो. अशावेळी Invester ला प्रीमियमची अमाऊंट गमवावी लागते.
Bearish Strategy –
जर शेअर मार्केट घसरणार असा तुमचा अंदाज असेल तर तुम्ही Call write करता आणि Put Buy करता. यामुळे इन्वेस्टरला नफा होतो.
1 ) Buying Puts
जेव्हा तुम्ही पुट कॉन्ट्रॅक्ट खरेदी करता, तेव्हा तुम्हाला भविष्यातील काही क्षणी स्ट्राइक प्राइसवर शेअर्स विकण्याचा अधिकार असतो. जर किमती स्ट्राइक प्राइसच्या खाली आल्या तर गुंतवणूकदाराना नफा होतो.
2 ) Writing Calls
जेव्हा तुम्ही Call Write करता, तेव्हा तुम्ही भविष्यातील काही क्षणी स्ट्राइक किमतीवर शेअर्स खरेदी करण्यास सहमत असता. जोपर्यंत किंमत स्ट्राइकच्या खाली राहते, तोपर्यंत करार निरर्थक संपतो. तथापि, जोखीम लक्षणीय आहे कारण किमती स्ट्राइकच्या वर गेल्यास लेखकाची गंभीर जबाबदारी आहे. पुट खरेदी करणे आणि कॉल लिहिणे ही मंदीच्या स्टॉक ऑप्शन्स ट्रेडिंगची लोकप्रिय धोरणे आहेत.
5paisa सह पर्याय ट्रेडिंग सुरू करा