नवी दिल्ली । बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. रशिया-युक्रेनमधील युद्ध संपण्याच्या वाढत्या शक्यतांमुळे आज बाजारात तेजी आली. आज सकाळी निफ्टी 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. ग्रीन मार्कमध्ये उघडल्यानंतर बाजारपेठेत सतत वाढ होत राहिली. दुपारच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून आली.
आज सेन्सेक्स 740.34 अंकांच्या वाढीसह 58683.99 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 172.95 अंकांच्या वाढीसह 17,498.25 वर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये वाढ झाली आणि तो 486.90 अंकांच्या वाढीसह 36334.30 वर बंद झाला.
बँकिंग, रियल्टी, ऑटो शेअर्स वाढले
आज बाजार 6 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, रियल्टी, ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मात्र मेटल, पॉवर, ऑइल-गॅस शेअर्समध्ये दबाव दिसून आला. दुसरीकडे मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. बीएसईचा मिड-कॅप इंडेक्स 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 24,023.91 वर बंद झाला. त्याच वेळी, स्मॉलकॅप इंडेक्स 1.05 टक्क्यांच्या मजबूतीसह 28,120.74 वर बंद झाला.
हरिओम पाईप IPO
हरी ओम पाईप्सचा IPO आजपासून म्हणजेच 30 मार्च 2022 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. या भागविक्रीतून कंपनीला 130.05 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनी 85,00,000 इक्विटी शेअर्स IPO द्वारे 144-153 रुपयांच्या किंमतीच्या श्रेणीत विकणार आहे. हैदराबादस्थित हरिओम पाईप्स लोखंड आणि पोलाद उत्पादने तयार करते ज्यामध्ये माईल्ड स्टील (एमएस) पाईप्स, स्कॅफोल्डिंग, एचआर स्ट्रिप्स, एमएस बिलेट्स आणि स्पंज आयरन यांचा समावेश आहे.
अदानी शेअर्सने दिले विलक्षण रिटर्न
जागतिक शेअर्स बाजार एक महिन्याहून अधिक काळ रशिया-युक्रेन युद्धाच्या उष्णतेत असतानाही, काही अदानी शेअर्सनी या कालावधीतही त्यांच्या भागधारकांना उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. नुकत्याच सूचीबद्ध झालेल्या अदानी विल्मारच्या शेअर्सच्या किंमती गेल्या एका महिन्यात जवळपास 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे, अदानी पॉवरच्या शेअरची किंमत NSE वर 181.40 रुपयांच्या लाइफटाइम हायवर पोहोचली. गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना सुमारे 40 टक्के रिटर्न दिला आहे. अदानी पोर्टच्या स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 7.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.