नवी दिल्ली । बुधवारीही भारतीय शेअर बाजारांवर नफावसुलीचे वर्चस्व राहिले. विकली एक्सपायरीच्या एक दिवस आधीच बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 566.09 अंकांनी घसरून 59610.41 वर बंद झाला तर दुसरीकडे, निफ्टीमध्ये 149.75 अंकांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 17807.65 च्या पातळीवर बंद झाला.
आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, आयटी शेअर्स मध्ये विक्री झाली. दुसरीकडे पॉवर, मेटल, ऑईल-गॅस शेअर्स मध्ये खरेदी झाली. आज मिडकॅप, स्मॉल कॅप शेअर्स मध्ये खरेदी झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.38 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये IRCTC चे शेअर्सही सुमारे 3 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
Ruchi Soya Share Price
बुधवार, 6 एप्रिल रोजी जेव्हा ट्रेडिंग सुरू झाला तेव्हा रुची सोयाच्या शेअर्समध्ये प्रचंड गोंधळ उडाला. गुंतवणूकदार त्याचे शेअर्स विकत होते, त्यामुळे रुची सोयाचे शेअर्स सुरुवातीच्या ट्रेडमध्ये 19% पर्यंत घसरले. याच्या एक दिवस आधीच कंपनीच्या बोर्डाने FPO नंतर पुन्हा शेअर्स विकून फंड उभारण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली होती. शेवटी, त्याचे शेअर्स NSE वर 13.75 टक्क्यांनी घसरून 755.25 रुपयांवर बंद झाले.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने मंगळवारी सांगितले की, इक्विटी शेअर्स आणि कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूसाठी अर्ज करणारे वैयक्तिक गुंतवणूकदार आता युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे 5 लाख रुपयांपर्यंत पैसे देऊ शकतात. म्हणजेच, वैयक्तिक गुंतवणूकदार आता UPI द्वारे इक्विटी शेअर्स आणि कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली.त्याचवेळी चांदीच्या दरात 643 रुपयांची घसरण झाली. ज्वेलरी बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,400 रुपयांच्या वर जात आहे. काल सोन्याचा भाव 51,451 रुपयांवर बंद झाला आणि आज तो 51457 रुपयांवर उघडला. 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,457 रुपयांवर उघडला. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 51,457 रुपयांवर उघडला.