मुंबई । गुरुवारी, संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान, भारतीय बाजारातही संमिश्र ट्रेड दिसून आला. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर अखेर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद होण्यात यशस्वी झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 85.26 अंकांच्या किंवा 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 61,235.30 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 45.45 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 18,257.80 वर बंद झाला.
गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, कोल इंडिया आणि यूपीएल निफ्टीमध्ये टॉप गेनर्स राहिले, तर विप्रो, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँक हे टॉप लुझर्स ठरले.
एका दिवसापूर्वी निफ्टी 61 हजारांच्या पुढे बंद झाला
याआधी बुधवारी सेन्सेक्स 533.15 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 61,150.04 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 138.70 अंकांनी किंवा 0.77 टक्क्यांनी वाढून 18,194.45 वर बंद झाला.
Go Airlines चा IPO प्लॅन पुढे ढकलला
नुस्ली वाडिया ग्रुपने कोविड-19 ची तिसरी लाट आणि त्याचा प्रवासी व्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या बजट एअरलाइनGo Airlinesचा 3,600 कोटी रुपयांचा IPO आणण्याची योजना तात्पुरती पुढे ढकलली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ग्रुपशी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
आज ‘या’ कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत
आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी Mindtree, Tata Metaliks, Aditya Birla Money, CESC, Athena Global Technologies, Eureka Industries, Gautam Gems, GTPL Hathway, Mega Corporation, Mishtann Foods, Palm Jewels, Plastiblends India, Rotographics (India) आणि Surana Solar यांसारख्या कंपन्या आपले निकाल जाहीर करतील.