मुंबई । शेअर बाजारातील 3 दिवसांच्या वाढीस बुधवारी ब्रेक लागला आहे. Sensex आणि Nifty दोघेही रेड मार्कवर बंद झाले. ट्रेडिंग संपल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) Sensex 333.93 अंकांनी किंवा 0.64 टक्क्यांनी घसरून 51,941.64 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) Nifty 104.70 अंक म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 15,635.40 वर बंद झाला.
हेवीवेटपैकी पॉवर ग्रिड, एसबीआय लाइफ, एनटीपीसी, टायटन आणि कोल इंडिया यांचे शेअर्स बुधवारी ग्रीन मार्क वर बंद झाले तर टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, श्री सिमेंट, एल अँड टी आणि रिलायन्स यांचे शेअर्स रेड मार्कवर बंद झाले.
सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलतांना बुधवारी सर्व सेक्टर रेड मार्कवर बंद झाले. यामध्ये फायनान्स सर्व्हिसेस, मेटल बँक, प्रायव्हेट बँक, पीएसयू बँक, फार्मा, रिअल्टी, एफएमसीजी, आयटी, मीडिया आणि ऑटोचा समावेश आहे.
BSE वर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 229 लाख कोटी रुपयांवर पोचले
BSE वर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल सोमवारी 229 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले. BSE Sensex सोमवारी 228.46 अंक म्हणजेच 0.44 टक्क्यांनी वधारून 52,328.51 वर पोहोचला. बाजार बंद होताना Sensex ची ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल सोमवारी वाढून 2,29,01,742.97 कोटींवर गेले कारण गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू ठेवली. यामुळे, शुक्रवारच्या मागील दिवसाच्या दिवसाच्या तुलनेत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1,81,694.26 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा