Meta चे शेअर्स घसरले, झुकेरबर्गच्या संपत्तीत झाली 31 अब्ज डॉलरची घट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Meta चे सीईओ मार्क झुकेरबर्गलाही फेसबुकच्या युझर्समध्ये घट झाल्यानेधक्का बसला आहे. मेटाच्या शेअर्समध्ये सुमारे 25 टक्के घसरण झाल्यामुळे मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत एका दिवसात $31 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. यासोबत झुकेरबर्ग जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या लिस्ट मधून बाहेर पडला आहे. 2015 नंतर ही अशी पहिलीच वेळ आहे की झुकेरबर्ग श्रीमंतांच्या टॉप 10 मध्ये नाही.

मेटाचा सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ याची संपत्ती देखील मेटाच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे जवळपास $3 अब्जने घसरून $21.2 अब्ज झाली आहे. डस्टिन हे जगातील 79 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याच्याकडे सध्या $92 अब्ज एवढी निव्वळ संपत्ती आहे, जी बुधवारी बाजार बंद असताना $120.6 अब्ज होती

शेअर्सच्या किंमती घसरल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीत लक्षणीय घट होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, टेस्लाच्या एलन मस्कचे नोव्हेंबरमध्ये शेअर्स कोसळल्यामुळे एका दिवसात $ 35 अब्जांचे नुकसान झाले आहे. टेस्लाच्या शेअर्सच्या घसरणीमागे स्वतः मस्क कारणीभूत होते. त्यांनी ट्विटर पोलद्वारे लोकांना विचारले होते की, त्यांनी टेस्लाची 10 टक्के विक्री करावी का? यानंतर टेस्लाचे शेअर्सघसरले.

त्रैमासिक निकालांमुळे घसरले मेटाचे शेअर्स
Meta ने जारी केलेल्या त्रैमासिक रिपोर्ट्स नुसार, 2021 च्या चौथ्या तिमाहीत फेसबुकने मागील तिमाहीच्या आधारे अर्धा मिलियन (सुमारे 5 लाख) जागतिक डेली युझर्स गमावले आहेत. 2004 मध्ये फेसबुकच्या स्थापनेनंतर ही पहिलीच वेळ आहे की, त्याचे डेली अ‍ॅक्टिव्ह युझर्स (DAUs) कमी झाले आहेत. या काळात कंपनीच्या नफ्यातही घट झाली आहे. मेटाच्या रिपोर्ट्स नुसार, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामच्या युझर्सची वाढही नगण्य आहे. 17 वर्षांत पहिल्यांदाच फेसबुकचे युझर्स आणि उत्पन्न दोन्हीमध्ये घट झाली आहे.

1.930 ते 1.929 अब्ज युझर्स
मेटा चे तिमाही आर्थिक परिणाम दर्शवतात की, Facebook च्या डेली अ‍ॅक्टिव्ह ग्लोबल युझर्सची संख्या एका तिमाहीपूर्वी 1.930 अब्ज वरून आता 1.929 अब्ज इतकी कमी झाली आहे. त्याच वेळी, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम सारख्या इतर मेटा अ‍ॅप्समध्ये युझर्सची वाढ खूपच कमी होती. जगभरात त्याचे 5 लाख युझर्स कमी झाले आहेत. मेटा ने डिसेंबर तिमाहीत $10.3 अब्ज कमावले. या कालावधीत, कंपनीची विक्री एका वर्षापूर्वी $ 28.1 बिलियन वरून $ 33.67 बिलियन झाली आहे. मात्र, आम्ही प्रति शेअर कमाई पाहिल्यास, ती एका वर्षापूर्वी $3.88 वरून $3.67 वर आली आहे.