हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आमदार अपात्रता प्रकरणावरुन सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार अपात्रता प्रकरणात सरकार व अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल, तर हे आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यानेच ते चालढकल करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार शिंदे यांनी आज एका आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. शिंदे म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या मुदतीत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाची सूचना गांभीर्याने घेतली जात नसेल, तर सत्तेतील सरकार आणि अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून चालढकल करत आहेत. ही बाब न्यायालयाने गांभीर्याने घेतल्यानंतर त्यांनी अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल. पूर्णपणाने हे आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झाल्यानेच ते चालढकल करत होते हे सिद्ध झाले आहे.
ही कारवाई वेळेत व्हायला हवी…
प्रत्येक आमदाराला स्वतंत्रपणाने बोलवायचे म्हणजे यातून दोन, तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. ही कारवाई वेळेत व्हायला हवी. पण, आमदार अपात्र ठरणार म्हणून जाणीवपूर्वक ही सुनावणी लांबवली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ही सुनावणी लांबवली जाण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिलपर्यंत लोकसभा निवडणूक आहे. पण डिसेंबर, जानेवारीपर्यंत मुदतीच्या आत ही निवडणूक घेतली जाईल.