सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
नुकतीच जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटींची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक राजकीय गटांनी बाजी मारली तर काही गटांना पराभव पत्करावा लागला. गांजे विकास सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती अमित (दादा) कदम यांच्या गटाने 11/0 ने दणदणीत विजयी मिळविला.
सोसायटी निवडणुकीत विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे माथाडी कामगारांचे नेते ऋषिकांत शिंदे, उपसरपंच सुनिल दिवडे, सचिन करंजेकर, दिपक कदम, सोमनाथ कदम, महेश कदम , राम कदम , आनंदा शेलार आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्व विजयी उमेदवार यांनी भैरवनाथ मंदिरा मध्ये दर्शन घेतले असून मंदिराच्या परिसरामध्ये विजयी सभा घेतली.
यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ म्हणाले, येणाऱ्या सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकाणमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येण्यापासून कोणीही थांबाऊ शकत नाही. जावळीचा स्वाभिमान राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहावे.
यावेळी अमित कदम यांनी पैशाची मस्ती असलेल्या पुढाऱ्याची गांजे गावच्या मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. हा विजय म्हणजे रयतेचे राज्य आणण्यासाठी असेल व जावलीचा स्वाभिमान राखण्यासाठी गांजे गावच्या ग्रामस्थांनी व मतदारांनी विजयी रुपी दाखवून दिला आहे, असे म्हंटले. यावेळी युवा नेते साधू चिकणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच विकास चिकणे यांनी सुत्रसंचालन केले व शंकर चिकणे यांनी आभार मानले.