हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. एका रॅलीमधील हा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केला गेलाय आणि त्याखाली अश्लील मजकूर सुद्धा लिहिण्यात आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहिसर येथील रॅलीमध्ये शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सामील झाले होते. अज्ञात व्यक्तींनी रॅलीतील व्हिडीओ एडीट करून सोशल मीडियावर शेअर केला. मातोश्री या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून तसेच घाणेरडा मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी काही जणांवर विनयभगांचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? pic.twitter.com/rpaqbMtiZU
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 11, 2023
दरम्यान, आज मी सुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहिण आहे. विरोधकांच्या घरीही आई बहिणी आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर वागू शकतात हे दिसून येतंय. यामध्ये युवासेनेचे कार्यकर्त्ये आहेत. आम्ही याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपींवर कारवाई केली जाईल असं शीतल म्हात्रे यांनी म्हंटल.