Shefali Jariwala Passed Away : ‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाचं निधन; शेवटची पोस्ट चर्चेत

Shefali Jariwala Passed Away
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shefali Jariwala Passed Away । ‘कांटा लगा गर्ल’ आणि ‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक शेफाली जरीवाला हिचं निधन (Shefali Jariwala Death) झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. तीच वय वर्ष अवघ 42 होते. शेफाली जरीवाला हिच्या निधनाने टीव्ही विश्वात खळबळ माजली आहे. कांटा लगा गाण्यामुळे ती सर्वात आधी प्रसिद्धिझोकात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाला रात्री 11 च्यासुमारास अस्वस्थ वाटू लागलं होते . तिच्या छातीत दुखू लागलं होतं. यानंतर तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. मात्र रुग्णालयात पोहोचताच अभिनेत्रीला मृत (Shefali Jariwala Passed Away) घोषित करण्यात आलं. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

काय होती शेफालीची शेवटची पोस्ट – Shefali Jariwala Passed Away

मृत्यूपूर्वी शेफालीची शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. शेफालीची एक्स (आधीचे ट्विटर) वरील शेवटची पोस्ट सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) याच्याबद्दल होती. माझ्या मित्रा, आज मी तुझा विचार करतेय, असं शेफाली 2 सप्टेंबर 2024 रोजी केलेल्या या पोस्टमध्ये म्हणाली होती. ती अनेक वर्षांपूर्वी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला डेट करत होती. शो दरम्यान तिचे हे आधीचे नाते उघड झाले होते.

शेफाली जरीवालाच्या निधनाची माहिती (Shefali Jariwala Passed Away) मिळताच तिच्या जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. गायक मीका सिंग याने शेफालीच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. फोटो पोस्ट करत तो म्हणाला, ‘या बातमीने मला धक्का बसला आहे आणि प्रचंड दु:ख झालंआहे. आमची लाडकी कलाकार आणि माझी प्रिय मैत्रीण शेफाली जरीवाला आपल्याला सोडून गेली आहे.’