Sunday, May 28, 2023

शर्लिन चोप्राकडून राज कुंद्रा-शिल्पा शेट्टीवर खळबळजनक आरोप, केली FIR दाखल

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर अलीकडे चर्चेत होता. या प्रकरणी पोलिसांनी शर्लिन चोप्राचे स्टेटमेंट नोंदवले होते, ज्यामध्ये तिच्यावर ऑनलाइन पॉर्न बनवण्याचा आणि वितरित करण्याचा आरोप करण्यात आला होता. आता शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात मानसिक आणि लैंगिक छळासह फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शर्लिन चोप्रा तिच्या लीगल टीमसह जुहू पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली, जिथे तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. शर्लिनने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने खुलासा केला आहे की, राज कुंद्राने तिचे केवळ शोषण केलेच नाही तर अंडरवर्ल्डची देखिलधमकी दिली.

एका पत्रकार परिषदेदरम्यान ती म्हणाली की,”तुम्ही मुलींना त्यांचे शरीर दाखवण्याचे पेमेंट क्लिअर का करत नाही? तुम्ही त्यांची फसवणूक का करता? तुम्ही त्यांना टोपी का घालता ?”

शर्लिन इथेच थांबली नाही, ती पुढे म्हणाली,”हा एथिकल बिझनेस आहे का? तुम्हाला बिझनेसमॅन बनायचे आहे, टाटा कसे बिझनेस करतात ते शिका. नैतिकतेसह, ते जे वचन देतात ते पाळताटी आणि आपण काय करता ? तुम्ही आर्टिस्टच्या घरी जाऊन त्यांचे लैंगिक शोषण करता. तुम्ही त्याच्या घरी जात आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देता. ते म्हणतात कि लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मागे घ्या अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल.”

शर्लिनने खुलासा केला की, ती 20 एप्रिल 2021 रोजी जुहू पोलिस स्टेशनमध्ये राज कुंद्राविरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी हजर झाली होती. राज कुंद्रावर आणखी आरोप करत शर्लिन म्हणाली की,” 27 मार्च 2019 रोजी कुंद्रा रात्री उशिरा तिच्या घरी आला होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.” ती पुढे म्हणाली की,” 27 मार्च 2019 रोजी तिने कुंद्राच्या दबावाखाली फोटोशूट केले.” त्यानंतर शर्लिनने आरोप केला की, पुढील 10 महिने राज कुंद्राने आपली दूसरी फर्म जेएल स्ट्रीममध्ये सामील होण्यासाठी तिच्या मागे गेला आणि फिटनेसशी संबंधित कन्टेंट अपलोड करण्यास सांगितले.

शर्लिनने यापूर्वीही आरोप केला होता की, राज कुंद्राने तिला जबरदस्तीने किस केले होते. शर्लिन म्हणाली होती की,” तिने राज कुंद्राला मागे ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र राज हे मान्य करत नाही ज्यामुळे ती घाबरून पळून गेली.”