Sunday, May 28, 2023

शिखर धवन- आयेशा मुखर्जीचा घटस्फोट; पत्नीने पोस्ट करत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवनने पत्नी आयेशा मुखर्जी सोबत घटस्फोट घेतला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सोशल मीडियावर आयेशा मुखर्जीने एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. शिखर धवनने मात्र अद्याप याबाबत अधिकृतरित्या काहीही स्पष्ट केलेले नाही.

२०१२ साली शिखर आणि आयेशा यांचे लग्न झाले होते. त्यानंतर २०१४ साली शिखर आणि आयेशा यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्याचे नाव जोराव्हर असे ठेवले होते. पण गेल्या वर्षी शिखर आणि आयेशा यांच्यामध्ये काही तरी बिनसल्याचे पाहायला मिळाले. कारण धवनने आयेशाला सोशल मीडियावर फॉलो करणे सोडून दिले होते. त्यानंतर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. पण आज अखेर शिखर आणि आयेशा यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे.

https://www.instagram.com/p/CTeBuiopxES/?utm_medium=copy_link

 

आयेशाने शिखरपासून वेगळे झाल्याची माहिती देताना पोस्ट केली आहे की तिला घटस्पोट हा घाणेरडा शब्द वाटत होता, मात्र, तिच्या आयुष्यात तिला दुसऱ्यांदा याचा अनुभव घ्यावा लागला. दुसऱ्यांदा घेतलेला अनुभव पहिल्या अनुभवाप्रमाणेच भितीदायक होता. तिला ती चूकत असल्यासारखे वाटत होते. पण जेव्हा सर्व भावनांचा आणि गोष्टींचा विचार केला तेव्हा तिला जाणवले की तिने घटस्पोटाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. ज्या प्रकारे मला त्याकडे पहायचे होते आणि ते अनुभवायचे होते.